नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना नंदुरबारच्या वतीने मकर संक्रांतिनिमित्त 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब नंदुरबारमधील पटेल वाडी येथील विठ्ठल मंदिरात सामूहिक आरती करून साकडे घातले.यावेळी विठ्ठलाला कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यासाठी सरकारला सुबुद्धी देवो अशी प्रार्थना करण्यात आली.
देशातील आतापर्यंत सहा राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे नुकताच हिमाचल प्रदेश सरकारने कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करून मकर संक्रातीचे गिफ्ट दिले आहे अशाच प्रकारे महाराष्ट्रातील सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा.इतर राज्यातील कर्मचाऱ्यांनी जो देईल पेन्शन त्याला देऊ मतदान असा जो निर्णय घेतला तसाच निर्णय आम्हालाही घ्यावा लागेल असे श्री दयानंद जाधव यांनी यावेळी सांगितले.पाच वर्षासाठी आमदार बनल्यानंतर त्यांना पेन्शन भेटते तर साठ वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन का नाही?असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.2024 च्या निवडणुकीपूर्वी निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण करावी अशी चर्चा झाली
यावेळी सहा राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले. यासाठी महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटना नंदुरबार तालुका अध्यक्ष दयानंद जाधव, जिल्हा संघटक अविनाश डोंगरे, धीरज खैरनार, पोलीस कर्मचारी रविकांत बागले, पोस्ट ऑफिस कर्मचारी संदीप बिडवे, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया नंदुरबारचे बालाजी बोबडे साहेब,प्रताप जाधव अश्विनी थोडसरे, विकास शेंडगे, अण्णासाहेब डक, पांडुरंग गाडे, पांडुरंग निळे, शिवशंकर देशमुख, भगवान व्यवहारे, अमोल भराट, विठ्ठल जरे,नीलकंठ गिरमीले,पद्माकर कदम,ओमशेखर काळा, दत्ता चव्हाण इ कर्मचारी उपस्थित होते.








