तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील करडे येथे गावठी रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतुस विकताना एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तळोदा पोलिसात सदर संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील करडे येथील अक्षय निजाम पाडवी (वय 32 रा. करडे) हा गावातील हनुमान मंदिराजवळ सार्वजनिक जागी बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतूस बाळगून असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, असइ संगीता बाविस्कर, गौतम बोराळे, अजय पवार, राजू जगताप, विजय बीसावे, तुकाराम पावरा, चंद्रसिंग वसावे यांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी दोन पंचांना पोलीस स्टेशनला बोलवून खात्री करून घेतली.
त्यानंतर पोलिसांनी सदर गावात जाऊन संशयित अक्षय निजाम पाडवी यास ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतल्यानंतर कंबरेच्या उजव्या बाजूस गावठी पिस्तुल असल्याचे दिसले. शिवाय त्याच्या उजव्या खिश्यात जीवत काडतुसे मिळून आले. या रिव्हॉलवरची किंमत 25 हजार व 3 हजार रुपयाची पितळी काडतुस असा एकूण २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
याबाबत पोहेकॉ तुकाराम फोपा पावरा यांच्या फिर्यादीवरून संशयित अक्षय निजाम पाडवी याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन केल्याप्रकरणी तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.








