Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वेड व झुमकावाली पोर या गाण्यांच्या तालावर थिरकली तरुणाई

team by team
January 16, 2023
in Uncategorized
0
वेड व झुमकावाली पोर या गाण्यांच्या तालावर थिरकली तरुणाई

नंदुरबार | प्रतिनिधी

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने शहरात प्रतिवर्षी साजरा होणारा पतंगोत्सव उत्साहात पार पडला. यानिमित्त पतंगप्रेमींच्या उत्साहाला अक्षरशः उधान आलेले होते. डीजेच्या तालावर युवकांकडून होणार्‍या जल्लोषाने पूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण दिसून आले होते. यावेळी बर्‍याच ठिकाणी वेड चित्रपटाचे गाणे व आई झुमकावाली पोर या गाण्यावर तरुण, तरुणींसह महिलांमध्ये जोश संचारला होता. पहाटे ५ वाजेपासून शहरात गाणे, ढोलताशांचा निनाद सुरु होता. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात, गच्चीवर महिलांसह आबालवृद्धांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत हा उत्साह कायम होता.

 

 

पौष महिन्यात हिंदुबांधवांचा मकरसंक्रांत  हा मोठा सण असतो. हा सण म्हणजे प्रेम, सामंजस्य, परस्पर सद्भावना यांचा दिव्य संदेश देतो. त्यामुळे या दिवसाला धार्मिक व भौगोलिक महत्व आहे.  पृथ्वीच्या मकरवृत्तावरुन सूर्याचा उत्तरेकडे कर्कवृत्ताच्या दिशेने प्रवास मकरसंक्रांतीपासूनच  सुरु होत असतो. मकरसंक्रांतीपासून सूर्याचे पृथ्वीसापेक्ष उत्तरायण सुरु होते. हा ॠतूबदलाचा किंवा संक्रमणाचा काळ आहे. म्हणूनच या दिवसाला मकरसंक्रांत म्हणून ओळखले जाते.

 

 

तिळगुळ देवून अमंगल गोष्टींचा नाश होऊन मांगल्याचा, प्रेमाचा संदेश लोक देतात. हा सण म्हणजे मनातील किल्मिष, गैरसमज आणि मानसामानसातील दुरावा, कटुता नष्ट करण्याची एक सुसंधीसुद्धा आहे. सद्भावना वाढीस लागून एकोपा निर्माण करण्याची संधी असते. तिर्थस्नानास ह्या दिवशी विशेष महत्व आहे.

 

 

नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमेवर वसलेला जिल्हा आहे. त्यामुळे गुजरात राज्यातील सर्वच सण, उत्सवांचा जिल्हयावर प्रभाव असतो. मग तो नवरात्रौत्सव असो, कृष्ण जन्माष्टमी असो की पतंगोत्सव हे सर्वच सण मोठया उत्साहात नंदुरबार जिल्हयात साजरे केले जातात. मकरसंक्रांतीचा सण गुजरात राज्यात व्यापक स्वरुपात साजरा केला जातो. पतंगोत्सव साजरा करण्यासाठी बालगोपालांची गेल्या पंधरा दिवसांपासून तयारी सुरु होती. पतंग उडविण्यासाठी मांजा तयार करण्याची लगबग आठवडयापासून सुरु होती. नंदुरबार जिल्हयात पतंग, मांजा विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली. पतंग, मांजा खरेदी करण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत पतंग विक्रेत्यांकडे झुंबड उडाली होती. नंदुरबारात काल पहाटेपासूनच चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण होते. बालगोपालांसह महिला, तरुण, तरुणींनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात, घराघराच्या गच्चीवर ढोलताशे, डीजेचा निनाद दिवसभर सुरु होता. गच्चीवरच नाश्ता, जेवणाची सोय असल्याने अधिकच उत्साह दिसून आला. यावेळी महिलांसह, तरुण, तरुणींनी पतंग उडविण्यासोबतच नाचण्याचाही मनमुराद आनंद लुटला. एकुणच पतंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

आमलाड येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात 

Next Post

भूमि अभिलेखच्या विभागीय क्रिडा स्पर्धेत या स्पर्धेत नाशिकच्या संघाने मारली बाजी

Next Post
भूमि अभिलेखच्या विभागीय क्रिडा स्पर्धेत या स्पर्धेत नाशिकच्या संघाने मारली बाजी

भूमि अभिलेखच्या विभागीय क्रिडा स्पर्धेत या स्पर्धेत नाशिकच्या संघाने मारली बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add