नवापूर l प्रतिनिधी
लाईट बाजारात पोलिसां कडून रस्त्यावर बेशिस्त वाहन पार्किंग करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने एकच खळबळ उडाली आहे .
अतिक्रमण आणि बेशिस्त वाहन पार्किंग मुळे मुख्यबाजार पेठ असलेल्या लाईट बाजार परिसरात नेहमी वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलीस आणि नगर परिषद प्रशासना कडून दि 13 जानेवारी ला नगरपरिषदे च्या सभागृहात बैठक घेतली होती.
बैठकीत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी अतिक्रमण कारवाई केव्हा होईल ते आम्ही सांगू शकत नाही परंतु वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दि. १४ जानेवारी २०२३ पासून बेशिस्त वाहन पार्किंग वर कारवाई चा इशारा दिला होता. त्याची अमंलबजावणी करत काल सकाळ पासून च पोलीस रस्त्यावर उतरल्याने कही खुशी कही गम असे वातावरण दिसून आले आहे.
पहिल्या दिवसाच्या कारवाईत डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून ते गांधीपुतळ्या पर्यंत वाहनावर दंड केला तर काही वाहने जप्त ही केले आहे.स्वतः पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,उपनिरीक्षक अशोक मोकळ,मनोज पाटील,जगदीश सोनवणे,पो हे ,पो हे का दादाभाई वाघ,विकी वाघ,भटु मावळे,योगेश थोरात,रणजीत महाले,दिनेश बाविस्कल,पवन राजपूत,शाम पेढारे,प्रमोद खैरनार आदीनी आपल्या टीम सहित रस्त्यावर उतरले असल्याने कारवाईचा धसका घेत वाहन चालक स्वतःहून आपली वाहने सरकवताना दिसले तर काहींना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.

कारवाई होतांना नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. दि 13 रोजी झालेल्या बैठकित नगर परिषदे कडून ही कारवाईचा इशारा मिळाला असल्याने काही व्यापारी आपली अतिरिक्त बांधकाम व शेड काढतांना दिसले.
शहरात अवैध व बेशिस्त वाहन पार्किंग करणार्यावर दंडात्मक किंवा जप्तीची कारवाई होणार असून नागरिकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन पार्क करावी कारवाई दरम्यान कोणीही नागरीक हस्तक्षेप करु नये असे आवाहन पोलिसां कडून करण्यात आले आहे.काल आठवडे बाजार असल्यामुळे शहरात वाहणाची वरदळ जास्त होती.यात जास्त आवाज करणारे बुलेट वाहणावर पण दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.यात जास्त गजबजलेला मार्ग महात्मा गांधी पुतळ्याजवळ रंगुन हॉटले समोर सर्व दुचाकी वाहने हटवुन त्याठिकाणी पोलिसांनी पट्टे मारुन पार्कीग झोन तयार करण्यात आले.यापुढे पण बेसिस्त वाहनावर अशाच कार्यवाया सुरु राहाणार असल्याची माहीती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दिली.








