नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिजामाता नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अन्नदानाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरातील गिरीविहार गेट परिसरात जिजामाता नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व अन्नदान करण्यात आले.
यावेळी जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश देवरे, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुनील भवर, हरीश हराळे, लल्ला मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल, संचालक लक्ष्मण मोरे, दिलीप मराठे, शारदाबाई अग्रवाल, आशाबाई पाटील या नवनिर्वाचित संचालकांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे कर्मचारी शैलेश शाह, भाईदास भदाणे, राहुल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.








