म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील कुबेर विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना मोफत सायकल वाटप व म्हसावद ग्रामपंचायत निवडणुकीत निवड झालेल्या सदस्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन अंबालाल अशोक पाटील होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी,शिक्षण विस्तार अधिकारी एस.एस.तावडे,केंद्रप्रमुख पराग चव्हाण, विद्या प्रसारक मंडळाचे सर्व संचालक माजी प्राचार्य ईश्वर पाटील, मुख्याध्यापक मनोज पाटील, पर्यवेक्षक ए.सी.पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी उपसरपंच सविता अंबालाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य चिंतामण उत्तम लांडगे,सचिन किशोर बेदमुथा,स्नेहा सचिन बेदमुथा,गायत्री विजय अहिरे,उषाबाई मंगू पवार,रोहिदास सोमा ठाकरे,सिंधुबाई रतिलाल शेमळे,विमलबाई वसंत मोरे,मगन शंकर भिल व संजय गोविंद पाटील, संदीप रमण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इ.९ वीच्या मुलींना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी,शिक्षण विस्तार अधिकारी एस.एस.तावडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण देसले यांनी केले व आभार ए.पी.पाटील यांनी मानले.या कार्यक्रमाला ग्रामस्थ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.