नंदूरबार l प्रतिनिधी
भुसावळ-मुंबई नवीन रेल्वे कालपासुन मुंबई- खा.डॉ.हिना गावित यांच्या सतततच्या पाठपुराव्यामुळे मुंबई सेंट्रल ते भुसावळ ही नविन प्रवासी गाडीला रेल्वे बोर्डाने मान्यता दिली असुन काल दि.10 जानेवारी रोजी ही प्रवासी गाडी मुंबई सेंट्रलहून सुटून सकाळी 8.33 वाजता नंदुरबार पोहचली तर 12 वाजता भुसावळ येथे पोहचणार आहे.
या गाडीला मुंबई सेंट्रल येथे हिरवा झेंडा दाखवून काल दि.10 रोजी स्वतः खा.डॉ.हिना गावित उद्घाटन करित याच गाडीतून प्रवास केला.यावेळी पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत, जिल्हा परिषद सदस्या डॉ.कुमुदिनी गावीत हे देखील प्रवास करीत नंदुबारला येथे पोहचले.
यापूर्वी खा.डॉ.हिना गावित यांनी खान्देश एक्सप्रेसची सुरूवात करून संपूर्ण नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची सोय केली होती. तथापी ही गाडी आठवड्यातून फक्त तीनच दिवस होती व प्रवाशांची संख्या अधिक असल्याने पुन्हा नविन गाडी मुंबई सेंट्रल ते भुसावळ अशी तीन दिवस ही गाडी सुरू होत आहे.
रविवार, मंगळवार व शुक्रवार ही गाडी मुंबई सेंट्रलहून रात्री 11.55 वाजता सुटेल बोरिवली, बोईसर, वापी, वलसाड, नवसारी, भेसतान, चलथान, बारडोली, व्यारा, नवापूर, दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, पालधी, जळगांव व भुसावळ येथे पोहचेल तर सोमवार, बुधवार व शनिवारी ही ट्रेन भुसावळ येथून सायंकाळी 5.40 वाजता निघेल.प्रवाशांनी या नविन रेल्वेचा लाभ घ्यावा असे आवाहन खा.डॉ.हिना गावित यांनी केले आहे.