म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील प.पु.सती गोदावरी माता माध्य.व उच्च मध्य.विद्यालय येथे शालेय विज्ञान प्रदर्शन 23 भरविण्यात आले होते.
यावेळी श्री.साईबाबा भक्त मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल हिरजी चौधरी व उपाध्यक्ष धारुभाई सदाशिव पाटील ,सरचिटणीस गणेश नरोत्तम पाटील संचालक मंडळ नानासाहेब अर्जुन आनंदा जगदाळे, नथ्थु लिमजी पाटील, नामदेव नारायण सुर्यवंशी, प्रसंन्नकुमार सुभाष बंब, हिरालाल बाबु पाटील,धनालाल ओंकार सुर्यवंशी उपस्थित होते तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती सुरेखा गुजर व पर्यवेक्षिका संगिता जयस्वाल व सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शालेय विज्ञान प्रदर्शनात प्रथम डॉ.सी .वी. रामन यांच्या प्रतिमेचे अनावर व पुजन अध्यक्ष विठ्ठल हिरजी चौधरी यांनी केले व कार्यक्रमाचे उध्दाटन उपाध्यक्ष धारुभाई सदाशिव पाटील यांनी फित कापुन शालेय विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात केली. त्या वेळी विज्ञानाची विविध उपकरने विद्यार्थी यांनी ठेवलेली होती .
इ. 5 ते 8 वी माध्यमीक गट व 9 ते 12 वी उच्च माध्यमिक गटात एकुण 32 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यात स्वच्छता उपकरण,जलमय प्रदेशातील तरंगनारे घर , फारमर हेलपिंग प्रोजेक्ट , स्वयंमचलीत वाघाचा पिंजरा ,पर्यावरणीय चिंता ,वैदिक गणित ,आरोग्य व स्वच्छता , गणितीय कोढे ,ज्वाला मुखी ,सायट्रिक आम्ल , ए. टी. एम चोकलेट मशीन ,पाण्याची पाचळी दाखवनारे यंञ ,घरगुती लाॅकर, स्याटेलाईट कम्युनीकेशन अश्या अनेक विषयांवर आधारीत उपकरणे होती. कार्यक्रमाचे आयोजन गणेश कन्हैया ,हेमंत शिरसाठ, श्रीमती.पुनम पटेल, श्रीमती भावना गुजर,मनोहर जाधव, मनोहर चव्हान, प्रविण पाटील व महेंद्र करवंदे यांनी केले .