नंदुरबार l
हिंदू धर्मियांची भावना दुखावणार्या व त्यांच्या अस्मितेवर घाला घालणार्या आगामी पठाण चित्रपटावर बंदी घालावी व चित्रपटगृहात प्रदर्शित करू नये, अशी मागणी समस्त हिंदू संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, अभिनेते शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘पठाण’ चित्रपटात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा या चित्रपट ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करू नये जर चित्रपट प्रदर्शित झाला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हिंदी चित्रपटसृष्टी तसेच हॉलीवूड यामध्ये सातत्याने सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल?, हाच प्रयत्न केला जातो.
हिंदु देवतांचा कसा अपमान करता येईल?, हीच संधी शोधली जाते. पठाण चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी बेशरम रंग या गाण्यात भगव्या रंगाचे अंतवर्स्त्र परिधान करून भगव्या रंगाचा अवमान केला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोचवण्यासाठी हे मुद्दाम केले गेले आहे. जे चित्रपटगृह हा चित्रपट प्रदर्शित करतील, त्यावर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिज, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने जयदीप चौधरी, मयुर चौधरी, रूपेश माळी, पंकज मराठे, विराज चौधरी, जय माळी, आनंद चौधरी, अविनाश चौधरी, खुशाल भोई, जयेश राजपुत, दर्शन चौधरी, क्रिष्णा जयस्वाल, क्रिष्णा चौधरी, राकेश माळी, गणेश माळी, नरेंद्र गवळी, जय महाले यांनी केली आहे. तसेच शहरातील चित्रपटगृह मालकांना देखील विनंतीपत्र देण्यात आले आहे.