नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर शहरात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करीत सुमारे ५५ हजार रुपयांचे घरातील साहित्य चोरुन नेल्याप्रकरणी एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील भगतवाडी परिसरातील डॉ.भांडारकर यांचे क्लिनिक तसेच गांधी पुतळा भागातील टिनाबेन पटेल व त्यांच्या घरासमोरील शितल सोसायटीतील गौरव अग्रवाल अशा तिघा घरातून चोरट्यांनी टिव्ही, सेटटॉप बॉक्स, पंखा, बॅटरी व पलंग असे एकूण ५४ हजार ५०० रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले.
याबाबत महेंद्र हरीभाई प्रजापत यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात संशयित अंकित राजू मराठे याच्याविरोधात भादंवि कलम ४५७, ३७९, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.नितीन नाईक करीत आहेत.