तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रांझणी येथे लुपिन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.देशबंधू गुप्ता यांच्या पुण्यतिथी निमित्त सेवा दिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
लुपिन ह्युमन वेलफेअर आणि रिसर्च फाउंडेशन नंदुरबार यांच्या माध्यमातून तळोदा तालुक्यामध्ये कुटुंब विकास व ग्रामविकासाचे विविध उपक्रम गाव पातळीवर राबविण्यात येत आहेत. दि.२६ जून २०२१ रोजी लुपिन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.देशबंधू गुप्ता यांच्या पुण्यतिथी निमित्त रांझणी येथे फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून बचत गटांच्या महिलांना आरोग्य विषयक माहिती देऊन वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करुन ४० वृक्षाची लागवड करण्यात आले व बीसीआय प्रकल्प अंतर्गत डेमो शेतकरी यांनी बियाणे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला मनिषा ठाकरे, अश्विनी गोसावी, अस्थंबा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, सभासद व बचत गटातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक लक्ष्मण खोसे, तालुका समन्वयक अभंग जाधव, बीसीआय चे तालुका प्रमुख प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमसिंग पावरा, ज्योती पाडवी, दिपक चौधरी, विद्या वसावे, विद्या पाडवी तसेच रांझणी गावातील दिपक मराठे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.