नंदुरबार | प्रतिनिधी
तापी पाटबंधारे विकास महामंडळचा हलगर्जीपणा व गलथान कारभारामुळे २२ उपसा सिंचन योजनांची अपूर्ण असलेली कामे पुर्ण होत नसल्यामुळे शेतकर्यांमध्ये मोठा उद्रेक झाला असुन २५ जानेवारी पर्यंत कामे सूरू न झाल्यास २६ जानेवारी २०२३ रोजी असंख्य शेतकर्यांनी जल समाधी घेण्याचा इशारा जिल्हाधिकार्यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की. शिंदखेडा, शहादा व नंदुरबार तालुक्यातील २२ बंद उपसा सिंचन योजनांना दुरूस्तीसह पूर्नकार्यान्वित करून, प्रकाशा / सारंगखेडा बॅरेजेसचा पाण्याचा वापर करून ३५ हजार एकर क्षेत्र कायमस्वरूपी सिंचना खाली येऊ शकते, त्यासाठी शेतकर्यांचा वतिने पी.के. अण्णा पाटील यांनी सन २०१२ मध्ये शासनाकडे मागणी केल्या नंतर विद्यमान श्री. सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पुरुषोत्तम पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ६ जून २०१६ रोजी शासनाने २२ बंद उपसा सिंचन योजनांना दुरूस्तीसह पूर्नकार्यान्वित करण्यासाठी रू. ४२ कोटीचा निधीसह मंजूरी दिली असता परंतू सन २०१८ साली प्रत्यक्षात कामास सुरूवात झाली. सन २०१९ मध्ये श्री विद्यासिनी उपसा उर्सियो धमाणे, श्री. जयभवानी उसियो निमगुळ, श्री.दाऊळ मंदाणे उसियो, श्री. सिध्देश्वर उसियो लहान शहादा या योजनांची रायझिंग मेन पाईप लाईनींची चाचणी घेण्यात आली आणि श्री. हरितक्रांती उसियो पुसनद, श्री. उत्तर तापी उसियों बिलाडी, श्री. दत्त उसियो सारंगखेडा, श्री. कामेश्वर उसियो बामखेडा या योजनांचा पंपाची चाचणी घेण्यात आली, त्यानंतर निधी अभावी दुरुस्तीचे कामे बंद झालेली असून आज पर्यंत बंदच आहे.
योजनांची दुरूस्ती कामे करतांना प्रत्यक्षात आलेल्या व संभाव्य अडचणी लक्षात घेवून तापी पाटबंधारे विकास महामंडळाने दाखल केलेल्या रु. ११५ कोटीचा सुधारित वाढीव प्रस्तावानुसार २१ जानेवारी २०२२ रोजी शासनाने पुन्हा सुधारित प्रशासकिय मान्यता देऊन, तापी महामंडळाला २२ उपसा सिंचन योजनांचे उर्वरीत कामे तातडीने सुरू करून, पूर्ण करण्यासाठी आणि योजनांना पूर्ण कार्यक्षमतेने पूर्नकार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले असतांना देखील आज जानेवारी २३ येऊन देखील २२ योजनांचा कामांना कुठेही सुरवात नाही. त्यामुळे योजनांचा लाभधारक शेतकर्यांना या जन्मात तरी पाणी मिळेल किंवा नाही.याची शास्वती वाटत नसल्यामुळे किंवा पाण्यासाठी शेतकर्यांचा आणखी किती पिढ्या खपतील असे वाटत असल्याने योजनांचा लाभधारक शेतकर्यांचा मनात शासना बद्दल मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. २२ उपसा सिंचन योजनांची कामे प्रलंबित ठेवण्याचा मागे तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता,अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता आणि संबंधित ठेकेदारांचे काही तरी साटेलोटे असावे असे वाटते,
कारण मार्च नंतर पुन्हा नविन डीएसआर नुसार नविन दराची मागणी करण्यात येईल आणि पुन्हा नव्याने प्रशासकिय मान्यता अशी सारखळीच सुरू राहील असे वाटते. आता येत्या महिन्याभरात रब्बी हंगाम संपेल व योजनांचा लाभक्षेत्रातील शेती दुरुस्तीची कामे करण्यासाठी पुर्णपणे उपलब्ध होईल त्यामुळे २६ जानेवारी पासून कामास सुरवात केली तर जूनचा अखेर पर्यंत कामे पूर्ण करून योजनांची संपूर्ण चाचणी होऊन योजना चालू करता होईल तरी वरील बाबतीत तातडीने योग्य कार्यवाही अमलात आणावी असे निवेदनात म्हटले आहे.२२ बंद उपसा सिंचन योजनांची दुरूस्तीची कामे २५ जानेवारी पर्यंत बिना विलंब सुरू न झाल्यास २६ जानेवारी रोजी योजनांचे शेतकरी लाभधारकासह प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजचा पात्रात जल समाधी आंदोलन करू. नमुद जल समाधी आंदोलनाचा काळात कोणाही शेतकरी सभासदाची जिवीत हानी झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तापी पाटबंधारे विकास महामंडळ व शासनाची राहील असा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला.निवेदनावर जिजाबराव गोरख पाटील, राजाराम दगडू पाटील, विनोद चिंतामण पाटील, महेंद्र सुभाष चौधरी, रितेश इसराज बोरसे यांच्या स्वाक्षर्या आहेत.








