म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थीनी अन्वी संदीप लोखंडे हिने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या यशात तिचे शिक्षक , आई-वडील , आजी बाबा यांचा वाटा आहे.अन्वी ही कोकणपाडा येथील प्राथमिक शिक्षक योगेश लोखंडे व राणीपूर येथील प्राथमिक शिक्षिका सोनाली एखंडे यांची कन्या आहे.तिचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.








