नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व्हा.चेअरमन निवड ४ जानेवारी रोजी झाल्यानंतर प्रथमच कारखान्याची मासिक सभा चेअरमन भरत गावित व व्हा.चेअरमन जगन कोकणी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली.सभेला सुरुवात करण्यापूर्वी डोकारे येथील आई देवमोगरा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात आले .त्यानंतर सभेची सुरुवात कोरोना काळात मयत झालेले संचालक व शेतकरी सभासद यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करुन करण्यात आली.
या सभेला उपस्थित अधिकारी, कर्मचारी, यांची संचालक मंडळ यांच्याशी ओळख परिचय करून देण्यात आला.त्यानंतर चेअरमन भरत गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या सभेत ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. अधिकारी , कामगार व गटनिहाय असलेल्या कार्यालयीन कर्मचार्यांनी शेतकर्यांचे ऊस वेळीत कापणी करून घ्यावीत व तसे नियोजन करावे.कारखान्याच्या कोणत्याही कर्मचार्याने ऊस तोड, ऊस वाहतूक व इतर बाबींसंबंधी शेतकर्यांकडून पैशांची मागणी केली तर त्यांची गय केली जाणार नाही असे स्पष्ट शब्दात भरत गावित यांनी सूचना वजा इशारा कारखान्याचा संबंधित असलेल्या कामगारांना दिल्या.

कुण्या शेतकर्यांने पैशांचा व्यवहार केला असेल किंवा कर्मचारी मागणी करत असतील तर त्यांनी संचालक मंडळातील सदस्यांना याची जाणीव करून द्यावी. संचालक मंडळाचा वतीने शेतकर्यांना पुरेपूर न्याय दिला जाईल, कुठल्याही प्रकारचा अन्याय शेतकर्यांवर होऊ देणार नाही असे ते म्हणाले तसेच शेतीविषयक तज्ञ अधिकार्यांनी शेतकर्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी योग्य प्रकारे सहकार्य करावे व शेतकरी बांधवांचा मेळावा आयोजित करून त्यांना शेतीविषयक माहिती, खताविषयी माहिती व इतर आवश्यक माहिती जी शेतीला अनुसरून असेल ती देत राहावी.
नवापुर तालुक्यातील शेतकर्यांना ऊस लागवडीसाठी जी सहाय्यता कारखान्याचा माध्यमातून करता येईल ती आम्ही प्रामाणिक पणे करण्यासाठी प्रयत्न शील राहू.कारखान्याचा कार्यक्षेत्रातील कृषी तज्ञ शेतकरी व अधिकारी यांच्यात बैठक आयोजित करून तालुक्यातील शेतकर्यांना कसे प्रगतशील करता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाईल असे भरत गावित यांनी आपल्या सांगीतले .या सभेला १६ संचालक व कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.








