Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकर्‍याकडून  १० हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावली लाचखोर तलाठ्याला दोन वर्षे कैदेची शिक्षा

team by team
January 8, 2023
in क्राईम
0
गुजरात राज्य ग्राहक आयोगाचा हॉस्पीटल व डॉक्टरांना ७० लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश

नंदुरबार | प्रतिनिधी

गदवाणी ता.अक्कलकुवा शिवारातील फळझाडांची नोंद होण्यासाठी एका शेतकर्‍याकडून सुमारे ३० हजाराची लाच मागून यातील १० हजाराची लाच स्विकारल्याप्रकरणी लाचखोर तलाठ्याला शहादा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षे कैदेची व पाच हजार रुपये दंडाची सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांनी अक्कलकुवा तालुक्यातील गदवाणी शिवारात साग, फणस, चिकू, आंबे, नारळ अशा झाडांची लागवड केली होती. यामुळे तक्रारदाराच्या गट नंबरमध्ये सदर झाडांची नोंद होण्यासाठी संबंधित तक्रारदारांनी लोकसेवक तलाठी श्री.कर्णे यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र सदर झाडांची नोंदणी करण्यासाठी तलाठी कर्णे यांनी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १० हजाराची लाच स्विकारत असतांना तलाठी कर्णे यांना पंच व साक्षीदारांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले होते. यामुळे त्याच्याविरुद्ध लाच स्विकारणे तसेच आपल्या पदाचा दुरुपयोग करुन भ्रष्ट मार्गाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लाचेची मागणी करुन स्विकारल्याने अक्कलकुवा पोलिसात सन २०१४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर खटल्याच्या सुनावणीत शहादा जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधिश-१ सी.एस.दातीर यांनी संशयित तलाठी कर्णे यास साक्षी व पुराव्यांच्या आधारे दोषी ठरवून काल दि.७ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक कायदा, १९९८ चे कलम ७ प्रमाणे एक वर्ष कैदेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी सुनावली आहे. तसेच कलम १३ (१) (ड) सह १३ (२) मध्ये दोन वर्ष कैदेची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

सदर खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता स्वर्णसिंग गिरासे यांनी सरकारतर्फे काम पाहीले. सदर गुन्ह्यात तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक आर.आर.बोठे, आर.व्ही.पगारे यांनी केला आहे. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक समाधान वाघ, पोना.अमोल मराठे यांनी कामकाज पाहीले.कोणीही लाच मागत असल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कच्चा रस्त्यामुळे पिकअप वाहन दरीत कोसळून अपघात

Next Post

शेतकर्‍यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ,डोकारे कारखान्याची पहिल्या मासिक सभेत  चेअरमन भरत गावित याचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

July 27, 2026
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add