Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर राम मंदिराची तारीख ठरली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले जाहीर

team by team
January 6, 2023
in राष्ट्रीय
0
अखेर राम मंदिराची तारीख ठरली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले जाहीर
दिल्ली l
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्या येथे निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी सांगितले की, १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर तयार होईल.त्रिपुरामधील लोकांनी आताच तिकीट बुक करुन ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. अमित शाह म्हणाले की, २०१९ साली मी भाजपाचा अध्यक्ष होतो. तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे की, “मंदिर वहीं बनाएंगे, तिथि नहीं बताएंगे”. तर राहुल गांधी आता कान उघडून ऐका, १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्यामध्ये गगनचुंबी राम मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल.”
अमित शाह म्हणाले की, “फक्त राम मंदिरच नाही, तर एक-दोन वर्ष जाऊद्या माँ त्रिपुरी सुंदरी देवीचेही भव्य असे मंदिर बनवू. ते पाहण्यासाठी जगभरातून लोक इथे येतील. आम्ही काशी विश्वनाथ कॉरिडोर बनवला. महाकाल कॉरिडोर बनवला. सोमनाथ आणि अंबा मातेचे मंदिर सोन्याचे होत आहे. माँ विंध्यवासिनीचे नवीन मंदिर बनत आहे.”
अनेक वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराच्या उभारणीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन केले आणि मंदिराची पायाभरणी केली. आता १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले की, मंदिर निर्माण करण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. सध्या ३५० मजूर आणि कारागीर दिवसरात्र एक करुन काम करत आहेत. यासोबतच साधारण एक हजार मजूर आणि कारागीर राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील वंशी पहाडपूर येथे काम करत आहेत. याठिकाणी मंदिरात वापरण्यात येणाऱ्या पाषाणांना आकार देण्याचे काम करत आहेत. इथूनच मंदिरासाठी लागणारे पिंक स्टोन आणले जाणार आहेत, अशीही माहिती मिश्र यांनी दिली.
बातमी शेअर करा
Previous Post

डी. टी. आंबेगावे आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित

Next Post

थ्री स्टार हॉटेल सारख्या अनुभव देणाऱ्या स्पर्श नर्सिंग होमच्या नूतन इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add