तळोदा । प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे स्वायत्त संस्था डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या मार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण राज्यात वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात आला.
भविष्यात अँक्सिजनचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे असे मार्गदर्शन करत तालुक्यातील समतादूत मार्फत दि.५ जून ते २६ जून २०२१ या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, खेड्यापाड्यात, प्रशासकीय कार्यालयात वृक्षारोपण करुन वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्टीचे महासंचालक यांच्या आदेशान्वये तसेच नंदुरबार जिल्हा प्रकल्प अधिकारी भानुदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टीचे तळोदा तालुका समतादूत कल्पना ठाकरे यांनी तळोदा तालुक्यातील दहा गावात सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक शिक्षक, ग्रा.प.कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आमलाड, सलसाडी, भंवर, पोलिस स्टेशन तळोदा, दलेलपूर, चिनोदा, धवळीविहीर, हलालपूर, काझीपूर, तळवे आदी गावात जि.प.शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, सार्वजनिक क्षेत्र या ठिकाणी एकूण ५५ झाडे लावण्यात आलेत. त्यात वड, पिंपळ, जाभुंळ, कडूलिंब, गुलमोहर, चिंच, सिताफळ, साग, पारस, महू आदी विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी बार्टीचे तळोदा तालुका समतादूत कल्पना ठाकरे यांनी परिश्रम घेतले.