नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व महासचिव डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील विविध ठिकाणी गरजू रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त विभागीय अध्यक्ष किशोर रायसागडा, प्रविण सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नेहरू चौक, रेल्वे स्टेशन परिसर, बस स्थानक परिसरात गरजूंना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नाशिक विभागीय सरचिटणीस विशाल माळी, जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे, वृत्तवाहिनीचे पत्रकार गौतम बैसाने, ज्ञानेश्वर माळी यांच्यासह पत्रकार जितेंद्र जाधव,अफिग बेग मिर्झा, देवीसिंग राजपूत, विरेंद्र गिरासे आदी पत्रकार उपस्थित होते. महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.








