नंदुरबार l प्रतिनिधी
नवीन वर्षाची आव्हाने पेलण्याची एक नवी उमेद साऱ्यांना लाभावी या उद्देशाने दरवर्षी नूतन वर्ष आरंभाला सूर्यनमस्कार घालून नववर्ष स्वागतचा अभिनव उपक्रम येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवला. सकारात्मक संस्कारांची रेलचेल व्यक्तिमत्वामध्ये बानवली पाहिजे या उद्देशाने श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत सूर्यनमस्काराने करण्याची प्रथा रूजविली आहे.
यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात,नाशिक विभागीय क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील,संस्थेचे चेअरमन ॲड.रमणलाल शाह, चार्टर्ड अकाउंटंट श्री पार्थ देसाई, सचिव डॉ.योगेश देसाई, मुख्याध्यापक सौ.सुषमा शाह,श्री. मनीष शाह, मुख्याध्यापक पूनम गिरी, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील,सौ. मीनाक्षी भदाणे,भद्रेश त्रिवेदी याप्रसंगी उपस्थित होते.
सुमारे 600 विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावर सूर्यनमस्कार घालून पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यकिरणांना प्रणाम केले.
आपल्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक सौ.सुषमा शाह यांनी मन व शरीराला सुदृढ करणारा हा सर्वांग सुंदर व्यायाम राबविण्याचा उद्देश प्रकट केला.कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी श्रीमती सुनंदा पाटील यांनी उपक्रमाला शुभेच्छा देत सूर्यनमस्कार आपल्या आरोग्यासाठी आवश्यक व उपयुक्त असल्याचे सांगितले. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आपल्या मनोगतातून शाळेने चांगला पायाला पाडल्याचे सांगीतले. या नूतन वर्षात आरोग्यमय समाजजीवन निर्माण होण्याची त्यांनी सद्भावना प्रकट केली.
या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी संगीत शिक्षिका सौ.अनघा जोशी,मैदान आरेखनासाठी हेमंत पाटील, दिनेश ओझा, शिवाजी माळी ,फलक लेखनासाठी महेंद्र सोमवंशी यांनी परिश्रम घेतले. संस्कृत सूर्य श्लोक योगेश शास्त्री यांनी गायले. सूर्यनमस्कार संचालन.सूत्रसंचालन हेमंत पाटील तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक राजेश शाह यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षकविद्या सिसोदिया, जगदीश पाटील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर सहकार्यांनी परिश्रम घेतले.








