नंदुरबार l प्रतिनिधी
उमर्दे खुर्द ता. नंदुरबर येथे ग्रामपंचायतिच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सरपंच अरविंद ठाकरे यांनी सपत्नीक केले.
उमर्दे खुर्द येथे येथील ग्रामपंचायत इमारत १९६८ साली बांधण्यात आली होती इमारत जुनी झाल्याने नवीन ग्रामपंचायत नवीन इमारतीची मागणी केली होती.
गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर उमर्दे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सरपंच अरविंद ठाकरे यांनी सपत्नीक केले यावेळेस उपसरपंच सागर साळुंके, ग्रामपंचायत सदस्य दामा भिल , श्रावण पाटील सामाजिक कार्यकर्ते गुलाब मराठे ग्रामसेवक भरत गूले, निंबा बेंद्रे, कैलास वळवी, शिवराम सोनवणे, दगे सिंग राजपूत,रामा मराठे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीसाठी वीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नवीन प्रशस्त ग्रामपंचायत इमारतीचे ८५० स्क्वेअर फुट बांधकाम केले जाणार असून. इमारतीमध्ये सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांचे स्वतंत्र खोल्या, मिटींग हॉल, स्री- पुरुष यांचे स्वतंत्र शौचालय, सोलर पॅनल आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या बांध कामास सहा महिन्याची मुदत दिली गेली आहे.