नंदुरबार l
नवापूर शहरातील शास्त्री नगरातून चोरट्याने दोन गायी चोरुन नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील शास्त्री नगर येथील राहूल प्रकाश दुसाणे यांच्या मालकीच्या एक गाय व एक गिर गाय असे १८ हजार रुपये किंमतीच्या दोन गायी अज्ञाताने चोरुन नेल्या. याबाबत राहूल दुसाणे यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.








