तळोदा l प्रतिनिधी
वनविभागाच्या जंगलालगत असलेल्या एका शेतशिवारात बिबट्याच्या जोडप्यासह चक्क सिंह ही पाहिल्याचा दावा दोघे शेतकरी बंधू व रखवालदार यांनी केला आहे. कारण शंभर फुटावरील असलेल्या बांधावर हा सिंह बसलेला होता तब्बल पाच ते सात मिनटं या तिघांनी त्याची गंम्मत पहिली होती लागलीच ही घटना वनविभागाला कळविल्यानंतर त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी या प्राण्यांचे पायाचे ठसे घेतले आहे.
गेल्या आठवड्यात बिबट्याने तळोदा शहरातील शहादा रस्त्यावरील एका सर्व्हिस स्टेशन जवळ धूम ठोकली होती त्यावेळी पादचारीचीही सौरभिर झोले होते. सहाजिकच तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचा वार्ता ऐकावयास मिळाल्या होत्या. मात्र गुरुवारी सकाळी येथील वनविभागाच्या परिसराला लागून असलेले बहुरूपा शिवारातील एका कपाशीच्या शेतात चक्क बांधावर सिहच बसलेला होता. सुरुवातीला रखवालदाराच्या मुलीस बसलेला दिसला तिथून ती भेदरलेल्या अवस्थेत पळत आली तिला विचारल्यावर तिने तिकडे बोट दाखवला तेव्हा शेतमालक उमाकांत शेंडे, शशिकांत शेंडे व रखवालदार रमेश पाडवी हे ही पहायला गेलेत, तेव्हा तो बांधावर बसलेला होता.त्यांनी पाच ते सात मिनिटे पर्यंत सिहाची गंमत पहिली त्यानंतर तो तेथून जवळच्या उसाच्या शेतात निघून गेला. या शेतकरी बंधूनी म्हशीचे दूध काढल्यानंतर घराच्या दिशेने निघाले असतांना तेथे जवळच लिंबाच्या झाडापाशी बिबट्या व त्याची मादी त्यांच्या मस्तीत दिसले होते. त्यामुळे हे अधिकच घाबरले त्यानी दुसरा रस्ता धरून घरी परतले. ही घटना वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे वनक्षेत्रपाल निलेश रोढे, वनपाल वासुदेव माळी, नंदू पाटील, विरसिंग पावरा, लक्ष्मी पावरा यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यांच्या पायाचे ठसे घेतले शिवाय लिंबाच्या झाडाच्या खुनाही घेतल्या याबाबत त्यांना विचारले असता पायाच्या ठस्या वरून सिह असल्याचे सांगता येत नाही मात्र आम्ही सायंकाळी ट्रॅप कॅमेरे या ठिकाणी बसवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी कळविल्यानंतर पथकासह घटनास्थळी दाखल होऊन जागेची पाहणी केली. त्या प्राण्यांचे पायाचे ठसे घेण्यात आले आहे परंतु त्यावरून सिंह च आहे असे सांगता येणार नाही परंतु याठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे त्यानंतरच खरी वस्तुस्थिती सांगता येईल
निलेश रोढे, वनक्षेत्रपाल, तळोदा
नेहमीप्रमाणे शेतात म्हशींसाठी उभारण्यात आलेल्या गोठ्यातील म्हशीचे दूध काढण्यासाठी गेलो होतो दूध काढत असतांना रखवालदाराची मुलगी बेधरलेल्या अवस्थेत रडत आली. तेव्हा तिने तिकडे बोट दाखविला आम्ही तिघांनी शंभर फुटावर बांधावर सिंहच बसला होता त्याची गंमत ही आम्ही पहिली तो सिंहच होता यावर आम्ही ठाम आहोत.
शशिकांत शेंडे, शेतकरी, तळोदा