Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुक्यात सिंह पाहिल्याचा शेतकऱ्यांचा दावा

team by team
September 9, 2021
in कृषी
0
तळोदा तालुक्यात सिंह पाहिल्याचा शेतकऱ्यांचा दावा
तळोदा l प्रतिनिधी
वनविभागाच्या जंगलालगत असलेल्या  एका शेतशिवारात बिबट्याच्या जोडप्यासह चक्क सिंह ही पाहिल्याचा दावा दोघे शेतकरी बंधू व रखवालदार यांनी केला आहे. कारण शंभर फुटावरील असलेल्या बांधावर हा सिंह बसलेला होता तब्बल पाच ते सात मिनटं या तिघांनी त्याची गंम्मत पहिली होती लागलीच ही घटना वनविभागाला कळविल्यानंतर त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी या प्राण्यांचे पायाचे ठसे घेतले आहे.
                गेल्या आठवड्यात बिबट्याने तळोदा शहरातील शहादा रस्त्यावरील एका सर्व्हिस स्टेशन जवळ धूम ठोकली होती त्यावेळी पादचारीचीही सौरभिर झोले होते. सहाजिकच तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचा वार्ता ऐकावयास मिळाल्या होत्या. मात्र गुरुवारी सकाळी येथील वनविभागाच्या परिसराला लागून असलेले बहुरूपा शिवारातील एका कपाशीच्या शेतात चक्क बांधावर सिहच बसलेला होता. सुरुवातीला रखवालदाराच्या मुलीस बसलेला दिसला तिथून ती भेदरलेल्या अवस्थेत पळत आली तिला विचारल्यावर तिने तिकडे बोट दाखवला तेव्हा शेतमालक उमाकांत शेंडे, शशिकांत शेंडे व रखवालदार रमेश पाडवी हे ही पहायला गेलेत, तेव्हा तो बांधावर बसलेला होता.त्यांनी पाच ते सात मिनिटे पर्यंत सिहाची गंमत पहिली त्यानंतर तो तेथून जवळच्या उसाच्या शेतात निघून गेला. या शेतकरी बंधूनी म्हशीचे दूध काढल्यानंतर घराच्या दिशेने निघाले असतांना तेथे जवळच लिंबाच्या झाडापाशी बिबट्या व त्याची मादी त्यांच्या मस्तीत दिसले होते. त्यामुळे हे अधिकच घाबरले त्यानी दुसरा रस्ता धरून घरी परतले. ही घटना वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे वनक्षेत्रपाल निलेश रोढे, वनपाल वासुदेव माळी, नंदू पाटील, विरसिंग पावरा, लक्ष्मी पावरा यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यांच्या पायाचे ठसे घेतले शिवाय लिंबाच्या झाडाच्या खुनाही घेतल्या याबाबत त्यांना विचारले असता पायाच्या ठस्या वरून सिह असल्याचे सांगता येत नाही मात्र आम्ही सायंकाळी ट्रॅप कॅमेरे या ठिकाणी बसवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी कळविल्यानंतर पथकासह घटनास्थळी दाखल होऊन जागेची पाहणी केली. त्या प्राण्यांचे पायाचे ठसे घेण्यात आले आहे परंतु त्यावरून सिंह च आहे असे सांगता येणार नाही परंतु याठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे त्यानंतरच खरी वस्तुस्थिती सांगता येईल
                                       निलेश रोढे, वनक्षेत्रपाल, तळोदा
नेहमीप्रमाणे शेतात म्हशींसाठी उभारण्यात आलेल्या गोठ्यातील म्हशीचे दूध काढण्यासाठी गेलो होतो दूध काढत असतांना रखवालदाराची मुलगी बेधरलेल्या अवस्थेत रडत आली. तेव्हा तिने तिकडे बोट दाखविला आम्ही तिघांनी शंभर फुटावर बांधावर सिंहच बसला होता त्याची गंमत ही आम्ही पहिली तो सिंहच होता यावर आम्ही ठाम आहोत.
                                     शशिकांत शेंडे, शेतकरी, तळोदा
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई येथे बदली

Next Post

शेतकरी कुटुंबातील असलेले नंदुरबारचे नवे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांचा२३ वर्षाचा प्रवास आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add