नंदुरबार l
शहरातील विमल विहार येथे चोरट्याने घरफोडी करीत टी.व्ही., सिलेंडर व मोबाईल असा १२ हजाराचे साहित्य चोरुन नेले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील जितेंद्र रुपचंद वाणी यांचे विमल विहार येथे घर आहे. सदर बंद घराचे चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश करुन घरातील ८ हजार रुपये किंमतीचा ३२ इंची टी.व्ही, ३ हजार २०० रुपये किंमतीचे दोन सिलेंडर व ८०० रुपये किंमतीचा एक मोबाईल असे एकूण १२ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले.
याबाबत जितेंद्र वाणी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.निलेश पाटील करीत आहेत.








