नंदुरबार ।
तालुक्यातील रजाळे येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने ऐतिहासिक १४३ मतांनी दणदणीत विजय मिळविल्याने नवनिर्वाचित लोकनियुक्त ३४ वर्षीय युवा सरपंच राजू देवचंद मराठे व सुशीला दिलीप पानपाटील, धनसिंग शामराव भिल, मनीषा ब्रिजलाल पांगारे व राकेश दिगंबर गायकवाड या सर्व सदस्यांचा व विजयात मोलाचा वाटा घेणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित , संसदरत्न खासदार डॉ.हिना गावित, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला आहे.
आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला रजाळे येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये विजयी उमेदवार सरपंच राजू देवचंद मराठे, सदस्या सुशीला दिलीप पानपाटील, सदस्या मनीषा ब्रिजलाल पांगारे, सदस्य राकेश दिगंबर गायकवाड, सदस्य धनसिंग शामराव भिल , सदस्य महेंद्र बापू गिरासे, सदस्य मुरलीधर हरी मराठे, सदस्या निता प्रमोद पाटील, सदस्या प्रियंका हेमराज पाटील, सदस्या रेखा छगन भिल
या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे सरपंच आणि ४ सदस्य तर शिवसेना विरोधी गटाचे ५ सदस्यांचा विजय झाला आहे. आता महिना उलटल्यानंतर उपसरपंच निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.








