नंदुरबार l
शहादा तालुक्यातील वडगाव येथे हद्दपारीचे आदेशाचे उल्लंघन केल्याने एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील ब्राह्मणपूरी येथील अजय उर्फ टायगर राजेंद्र पावरा याला दोन वर्ष कालावधीसाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश असतांना अजय पावरा हा वडगाव येथे फिरतांना आढळून आला. याबाबत पोना.विकास कापुरे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.जितेंद्र ईशी करीत आहेत.








