नंदुरबार l
नवापूर शहरातील गांधी पुतळ्याजवळ वाहनाने धडक दिल्याने अनोळखी भिखारीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील गांधी पुतळ्याजवळ अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन एका ५० ते ५५ वय असलेल्या भिखारी पुरुषास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत दुर्गेश काशिनाथ सोनार यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३७/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जगदिश सोनवणे करीत आहेत.