नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नाताळ सणानिमित्ताने सास्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हाच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री , सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करनवाल तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, संस्थेचे चेअरमन जे.एच पठारे, एस. ए. मिशन हायस्कूलच्या प्राचार्या व ट्रस्टी सौ.नुतनवर्षा वळवी , तसेच संस्थेचे विश्वस्त डॉ. राजेश वसावे, मार्थाबाई सुतार, राजेश वळवी, आर.के. वळवी, अनुप वळवी, मराठी प्रा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा कालू, इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता अहिरे, इंग्लिश मिडीयम प्रायमरीचे मुख्याध्यापक संदेश यंगड, इंग्लिश मिडीयम चे पर्यवेक्षक . सबस्टीन जयकर, प्रायमरी मिडीयाच्या पर्यवेक्षिका रोहिनी वळवी, संगीता रघुवंशी तसेच शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच के. जी. सेक्शन, प्रायमरी विभाग व हायस्कूलच्या विद्यार्थांनी नाताळ निमित्ताने सास्कृतिक कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना लवणे, योजना शिंगारे, रोशनी शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन लिपिका असिजा यांनी केले.