Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंदाणा-भम्राटा रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध: आ.राजेश पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश

team by team
December 24, 2022
in राजकीय
0
मंदाणा-भम्राटा रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध: आ.राजेश पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश

नंदुरबार | प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील पुर्वोत्तर भागातील तसेच मध्य प्रदेशच्या सीमालगतच्या गावातील  जावदे मंदाणे असलोद दूधखेडा या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या मजबुतीकरणासह  रुंदीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सीआरआयएफ योजनेअंतर्गत मंजूर केला असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आ. राजेश पाडवी यांनी दिली.

तालुक्यातील पूर्वोत्तर भागातील अनेक गावाचा थेट संबंध मध्य प्रदेश राज्याशी जोडला जातो या भागातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी मध्य प्रदेश मध्ये जातात मात्र जावदा ते भम्राटा नाका यादरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असल्याने येथील शेतकर्‍यांसह नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता खराब रस्त्यामुळे वारंवार वाहन नादुरुस्त होणे यामुळे आर्थिक भुर्दंड सोसण्यासह रस्त्यावरून मार्गक्रमण करताना खड्ड्यांमुळे वाहन चालक व सहप्रवाशांना पाठी मानेचे दुखणे होणे अशा अनेक  आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत होता यामुळे या महत्त्वपूर्ण रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांसह नागरिकांनी आ.राजेश पाडवी यांच्याकडे केली होती.

शेतकरी व नागरिकांच्या या मागणीची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी केंद्र शासन व राज्य शासनाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू ठेवला होता या पाठपुरावाला यश येऊन १२ डिसेंबर रोजी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जावदे – मंदाना- असलोद -दुधखेडा या प्रमुख जिल्हा मार्गावरील मंदाणे जावदा ते मध्य प्रदेशाच्या सीमा लगाच्या भम्राटा नाका या रस्त्याच्या मजबुतीकरणासह दुरुस्तीसाठी सी आर आय एफ योजनेअंतर्गत सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे याबाबतचे पत्र केंद्रीय मंत्र्यांनी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवालयास दिले असून निधी हस्तांतरित केला असल्याने येत्या काही दिवसातच या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामास सुरुवात केली जाणार असून परिसरातील शेतकरी व नागरिकांना याचा दळणवळणासाठी लाभ होणार असल्याची माहिती आ.राजेश पाडवी यांनी यावेळी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

नाताळ निमित्त मिशन स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

Next Post

तळोदा येथे पालिकेच्या सभेत सर्वसाधारण सभेत प्रारूप विकास आराखड्यासंबंधी वादग्रस्त दोन विषय नामंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add