Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चारचाकी वाहन चोरी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, दोन लाखाचे वाहन हस्तगत

team by team
December 23, 2022
in क्राईम
0
तीन जिल्ह्यात ३१ घरफोड्या करणारा सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

नंदुरबार  |  प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील खेडदिगर येथुन चार चाकी वाहन चोरी करणार्‍याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असुन  २ लाख रुपये किमतीचे वाहन हस्तगत  केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि,दि. १३ ते १४ डिसेंबर दरम्यान म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील खेडदिगर गावातील हिरा मोती फर्टिलायझरचे बाजुला पंडीत गंगाराम चौधरी यांचे २ लाख किमंतीचे पिकअप वाहन (क्र.एम.एच.३९, सी. ५५८३) हे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले, म्हणुन श्री. पंडीत गंगाराम चौधरी रा- मेहरबान रोड खेतीया ता- पानसेमल जि- बडवानी यांच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्याते येथे अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले वाहन धुळे शहरातील ८० फुटी रोडावर रस्त्याच्या बाजूला मिळून आल्याने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी ते वाहन चाळीसगांव रोड पोलीस ठाणे येथे आणून उभे केलेले होते. सदर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ एक पथक तयार करुन धुळे येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर वाहनाबाबत खात्री करुन ताब्यात घेतले होते, परंतु चोरी करणारे आरोपी मात्र अद्याप मिळून आलेले नव्हते.

 

 

 

 

 

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी २२ ते २३ डिसेंबर  दरम्यान रात्री संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यात आलेली होती व े पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील हे जिल्ह्यातील प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी देत होते.. त्यादरम्यान पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुमारे ८ ते ९ दिवसापूर्वी म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील खेडदिगर गावातून चोरी झालेली पिकअप ही बेहडीया ता.पानसेमल जि.बडवाणी मध्य प्रदेश येथील सुनिल पावरा, पिंटु ओंकार भिल यांनी मिळून केलेली असून सुनिल पावरा हा सद्या खेडदिगर गावात फिरत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळविल्यानंतर त्यांनी म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळवून बातमीची खात्री करून तात्काळ संशयीतांना ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपी याचा खेडदिगर गावात व परिसरात शोध घेतला असता खेडदिगर गावात मारुती मंदीराजवळ  सुनिल सुरेश पावरा रा. बाजार पेठ मार्ग, बोरकुंड ता. जि. धुळे ह.मु. बेहडीया ता. पानसेमल,जिल्हा बडवाणी,मध्य प्रदेश याला अटक केली.

 

 

 

सुनिल पावरा यानेे सुमारे ८ ते ९ दिवसापूर्वी त्याचा नातेवाईक पिंटु ओंकार भिल रा. बेहडीया ता. पानसेमल जि.बडवाणी याच्या मदतीने खेडदिगर येथून रात्रीच्यावेळी एक पिकअप वाहन चोरी केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले पिकअप वाहन हे धुळे येथे विक्री करण्याच्या उद्देशाने घेवून गेलो होतो, परंतु सदरचे वाहन विक्री न झाल्याने ते धुळे शहरातील ८० फुटी रोडावर रस्त्याच्या बाजूला उभे करुन तेथून तो व त्याचा साथीदार पिंटु भिल तेथून पळुन गेलो बाबत सविस्तर हकिगत सांगितली. त्याअनुषंगाने पिंटु ओंकार भिल रा. बेहडीया ता. पानसेमल जिल्हा बडवाणी याचा बेहडीया व आजू-बाजूच्या परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

 

 

 

ताब्यात घेण्यात आलेला आरोपी व गुन्ह्यातील २ लाख रु. किं.चे एक पांढर्‍या रंगाचे पिकअप वाहन (क्र.एम.एच.३९, सी. ५५८३)असे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी म्हसावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार विनोद जाधव, सजन वाघ, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, गोपाल चौधरी, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या निलंबना विरोधात नंदूरबार येथे डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन

Next Post

भांडणाची कुरापत काढुन गुप्तीने गळ्यावर वार करुन वृद्धेचा खून

Next Post
भांडणाची कुरापत काढुन गुप्तीने गळ्यावर वार करुन वृद्धेचा खून

भांडणाची कुरापत काढुन गुप्तीने गळ्यावर वार करुन वृद्धेचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add