नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेले निलंबन विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार येथे गिरीविहार गेट जवळ निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले की, सातत्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम हे घटनाबाह्य इडी सरकार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना हिवाळी अधिवेशनात बोलू नयेत शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेचे प्रश्न मांडू नयेत आणि बेळगाव सीमावादावरील लक्ष्य विचलित करण्याच्या हेतूने त्यांना सत्ताधाऱ्याच्या आग्रहाखातर अधिवेशना पुरते निलंबित करण्यात आले आहे.याच्या निषेधार्थ आज जिल्ह्याच्या वतीने निदर्शने करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे,युवक प्रदेश सचिव ॲड. राऊ मोरे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाविस्कर, माधव मामा,जिल्हा कार्यकारिणी सदस्य जितेंद्र खांडवे,महेंद्र चौधरी,शहराध्यक्ष नितीन जगताप,शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर,शहादा तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा,महिला जिल्हा समन्वयक सिमा सोनगरे,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंडारे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी,युवती जिल्हाध्यक्षा शितल पावरा, सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे,विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष बबलु कदमबांडे,
सेवा दल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष छोटु कुंवर, ओबीसी सेल जिल्हा समन्वयक निलेश चौधरी,महिला आघाडी नंदुरबार शहराध्यक्षा उषा तायडे,नंदुरबार शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे,नंदुरबार युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, युवक तालुकाध्यक्ष दिनेश माळी, युवक शहादा शहर कार्याध्यक्ष शुभम कुवर,शहादा महिला तालुकाध्यक्षक्षा रेश्मा पवार, विद्यार्थी शहराध्यक्ष जयेश मोरे,ओबीसी तालुकाध्यक्ष संजय पाटील,धनराज नाना बच्छाव,मोतीलाल पाटील, जितेंद्र कोकणी,प्रकाश पाटिल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.








