नंदुरबार l
पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईल च्या सवयींपासून लांब करण्यासाठी पुस्तकांमधील व्हिडिओ पाहून मोबाईलच्या उपयोग ज्ञान ऊर्जेसाठी करावा त्यासोबतच मुलांच्या शारीरिक विकासासाठी मैदानी खेळाकडे आकर्षित करावे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम यांनी केले.
नगर पालिका प्राथमिक शिक्षण मंडळ अंतर्गत शालेय क्रिडा स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ शाळा क्रमांक एक येथे घेण्यात आला. नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम , माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनुस पठाण, प्रभारी उपशिक्षणाधिकारी (योजना) जि. प. तथा प्रशासन अधिकारी नगर पालिका शिक्षण मंडळ नंदुरबार व शहादा भावेष सोनवणे, शिरपूर येथील मोहन चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी श्री कदम बोलत होते. यावेळी सर्व प्रथम सरस्वती पुजन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बक्षिस वितरण खालील प्रमाणे करण्यात आला. कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
या क्रिडा महोत्सवाच्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजय सोनवणे यांना राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार प्रदान मिळाल्याबद्दल त्यानिमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जमील अहमद अ. हमीद मोमीन, रणजित नाईक, करण चव्हाण, दासु कोकणी, वासुदेव राजभोज, सुधीर सोनवणे, महारु चौरे, फिलीप मावची, सचिन आव्हाड, शिरीष पवार, संतोष सदाराव, पराग पाटील, श्रीमती. प्रियंका खैरनार, आशिष जैन, श्रीमती काझी नुसरतजहाँ, श्रीमती नाजेमा परवीन शेख जहीरोद्दीन, मयुर सुर्यवंशी, सुजित पांडे, श्रीमती अर्चना गावित, श्रीमती अन्सारी अमिना, श्रीमती मनिषा धनगर, श्रीमती प्रियांका देसले, श्रीमती संजोगता वसावे, श्रीमती शगुप्ता किफायतखान, शेख जुलमिनन, श्रीमती अकिलाबी मोहम्मद अब्बास, श्रीमती नुतन सावंत, भरत पाटील, श्रीमती मन्सुरी सुमय्या बानो, लिलेश गोसावी, श्रीमती रफिकुन्नीसा, श्रीमती तसनीम कौसर अ रऊप, पिंजारी जहुर, शेख मो. जैद, नईम धोबी, श्रीमती उषा गावित, श्रीमती स्वाती चौधरी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुदस्सीर काझी व श्रीमती निशा सोनवणे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. विजय सोनवणे यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भावेष सोनवणे यांनी केले.








