Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण, अनुसूचित जनजाती आयोगाची नोटीस,  30 दिवसात हजर राहण्याचे दिले आदेश

team by team
December 23, 2022
in राज्य
0
इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत
  नंदुरबार l
तालुक्यातील आदिवासी शेतकरी ,पवन ऊर्जा आदिवासी जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे यांच्या नेतृत्वाखाली पवन ऊर्जा निर्माण करणारी सुजलॉन व तिची उपकंपनी सर्जन रियालिटी यांच्या विरोधात गेल्या अनेक वर्षापासून लढा लढत आहेत. आदिवासींची वडिलोपार्जित जमिनीवर शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता मागील 15 ते 16 वर्षापासून पवन ऊर्जा टावर मधून निर्माण होणाऱ्या विजेला वाहून नेण्यासाठी पोल, रस्ते, वीज जनित्र व कंपनीचे महाकाय ट्राल्या चालवून स्वतःच्या फायद्यासाठी जमिनीची नाशधुस केली आहे. यामुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे जीवन जगण्याचे साधन नसल्याने रोजगार अभावी  त्यांना गुजरात राज्यात मजुरी करण्या साठी जावे लागत आहे
.याबाबतीत अनेक वर्षापासून कंपनीच्या  विरोधात तसेच कंपनीचे संचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली होती . या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,राज्यपाल , मुख्य आयुक्त ,महसूल आयुक्त, आदिवासी मंत्र्यांना वेळोवेळी निवेदन देत आले परंतु या निवेदनांना केराची टोपली शासनाने दाखवली. शासनाने सुजलोन कंपनीची बाजू घेऊन आदिवासींचा घोर अपमान केला आहे. यानंतर समितीने अनुसूचित जनजातीचे आयोगाचे अध्यक्ष श्री चव्हाण व सदस्य अनंता नायक यांना भेटून यासंदर्भात आयोगाकडे तक्रार दाखल केली या तक्रारीची आयोगाने गंभीर दखल घेऊन नंदुरबार जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव तसेच सुजलोन एनर्जी पुणे याचे महानिर्देशक यांना नोटीस देऊन 30 दिवसात स्वतः हजर राहावे किंवा सुयोग्य उत्तर आयोगाला पाठवावे असे सांगितले. या आशयाचे पत्र आयोगाने समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे यांना दिले.
या निर्णयामुळे समितीच्या वतीने तसेच आदिवासी शेतकऱ्यांनी आयोगाच्या निर्णयाचे  स्वागत केले असून लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे .या संदर्भात आज नवापूर चौफुली येथील देवमोगरा माता मंदिर येथे पवन ऊर्जा आदिवासी जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समितीतर्फे बैठक घेण्यात आली बैठकीला समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे सचिव भीमसिंग पाडवी बापू दगा भिल, नाना भिल, साहेबराव भिल, हिरामण भिल बळीराम, भिल आप्पा बैसाणे ,प्रभात पाडवी सुखदेव भिल , व शेतकरी उपस्थित होते…
बातमी शेअर करा
Previous Post

श्रॉफ हायस्कूलमध्ये गणित दिन उत्साहात

Next Post

पालकांनी आपल्या पाल्याच्या शारीरिक विकासासाठी मैदानी खेळाकडे आकर्षित करावे : शिक्षणाधिकारी डॉ. मच्छिंद्र कदम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add