Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रॉफ हायस्कूलमध्ये गणित दिन उत्साहात

team by team
December 23, 2022
in शैक्षणिक
0
श्रॉफ हायस्कूलमध्ये गणित दिन उत्साहात
नंदुरबार | प्रतिनिधी –
येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूलमध्ये श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणित प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी गणित नाटिका, गणितवर आधारित नृत्य सादर करून विद्यार्थ्यांची गणिताविषयीची भिती दूर करण्याचा प्रयत्न केला.
२२ डिसेंबर हा प्रसिद्ध गणित तज्ज्ञ श्रीनिवास  रामानुजन यांचा जन्म दिवस गणित दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या गणित दिवसाचे औचित्य साधून येथील श्रीमती हिरीबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूलमध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी मुख्याध्यापिका सौ.सुषमा शहा, उपमुख्याध्यापक श्री.राजेश शहा, पर्यवेक्षक श्री.जगदीश पाटील, पर्यवेक्षिका सौ.विद्या सिसोदिया आदींनी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. सुषमा शहा यांनी विद्यार्थ्यांना जीवनात गणिताचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी गणित प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विशाखा अनिल सोनवणे, भुमी विनायक शिंदे, वैष्णवी दिपक जोशी, धृविका शरद बारी या विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांना गटानुसार विविध प्रश्न विचारून गणिताबाबत उद्बोधन करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांची गणिताविषयीची  भिती दूर व्हावी यासाठी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी गणित नाटिका सादर केली. याशिवाय गणितावर आधारित नृत्य व स्वरचित कविताही सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील विद्यार्थिनी अनुष्का धनगर आणि वैष्णवी पवार यांनी केले.  प्रास्ताविक कृष्णा पाटील याने केले. आभार प्रेम बागुल याने मानले.
 कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्व गणित शिक्षकांनी व शालेय परिवाराने परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

 महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

Next Post

आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण, अनुसूचित जनजाती आयोगाची नोटीस,  30 दिवसात हजर राहण्याचे दिले आदेश

Next Post
इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण, अनुसूचित जनजाती आयोगाची नोटीस,  30 दिवसात हजर राहण्याचे दिले आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add