नंदुरबार l
शहादा तालुक्यातील चिरखान येथील महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील चिरखान येथील यमुनाबाई प्रदिप चव्हाण या महिलेस रंजना अमृत भंडारी हिने पती अमृत भंडारी यांचे मोबाईलवर फोटो का पाठविला असे सांगून यमुनाबाई चव्हाण यांची बदनामी करुन शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
तसेच अमृतसिंग दिलीप भंडारी व ताईबाई दिलीप भांडणारी यांनी मानसिक त्रास दिला. बदनामी व त्रासाला कंटाळून यमुनाबाई चव्हाण यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. याबाबत प्रदिप फाडसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.








