Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सारंगखेडयात ११ लाखांची ‘पूनम’ ठरली आकर्षण

team by team
December 16, 2022
in राज्य
0
सारंगखेडयात ११ लाखांची ‘पूनम’ ठरली आकर्षण

सारंगखेडा | वार्ताहर-

येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला आठवडा झाला असून यात्रेकरुंची गर्दी कायम आहे. यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या अश्व बाजारात सर्वाधिक किमतीची ११ लाख रुपयांची गुजरातची पुनम नावाची घोडी आकर्षण ठरली आहे. आजपर्यंत ५५० घोड्यांची विक्रीतून २ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

 

 

येथील अश्वबाजारात देशाच्या कानाकोपर्‍यातून आतापर्यंत सर्वाधिक अश्व आले आहेत. अश्व खरेदी, विक्रीचा व्यापार वाढत आहे. सर्वाधिक घोडे तामीळनाडूतील खरेदीदारांनी खरेदी केले. त्यानंतर गुजरात, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडातील खरेदीदारांनी घेतले. यंदा उत्तरप्रदेशहून सर्वाधिक घोडे विक्रीसाठी आले आहेत.

 

यात्रेत खरेदीदारांची गर्दी कायम आहे. ही यात्रा अजून १५ दिवस सुरू राहील. यात्रोत्सवाच्या व्यापारातून आतापर्यंत १० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

 

 

११ लाखाची ‘पूनम’
मंगळवारी अश्व बाजारात ४७ अश्वांच्या विक्रीतून २५ लाख ५० हजाराची उलाढाल झाली. आजअखेर ५५२ घोडयांची विक्रीतून २ कोटी ४ लाखाची उलाढाल झाली आहे. त्यात पुनम नावाची घोडीला ११ लाख रुपयाचा दाम मिळाला. उत्तर प्रदेशचे रिकू महाराजसिंह राजपूत यांनी ही घोडी विकली. तिचा खरेदीदार राजकोट (गुजरात) येथील जेवजीभाई सोळंकी यांनी खरेदी केली. पंचकल्याण पंजाब जातीची लाल महंवा रंगाची आहे. तिचे वय २ वर्ष आहे.

 

 

 

अश्व ट्रॅकवर स्टंटबाजी
अश्व ट्रॅकवर अश्वांचा सराव करतांना अनेक जण अश्वावर बसून स्टंटबाजी करतात. अश्वावर उलटे बसून, अश्‍व उभे राहणे, अश्वावर हात सोडून कर्तबगारी दाखवित आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाका, प्रमाणपत्राच्या पैशांची चौकशी व्हावी, सुनील घनवट यांची मागणी

Next Post

भरत गावित यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Next Post
भरत गावित यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

भरत गावित यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add