सारंगखेडा l प्रतिनिधी
चार शतकांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या श्रीदत्त यात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या चेतक फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्यांचे स्वागत ऐतिहासिक पध्दतीच्या गड .किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीनी करण्यात आली आहे . अश्व स्पर्धा साठी येणाऱ्या अश्वांची सोय देखील राजेशाही पध्दतीने करण्यात येणार आहे .
येथे महानूभाव पंथीयांचे महत्वाचे ठिकाण असलेल्या एकमुखी श्री . दत्त यात्रेला ८ डिसेंबर पासून सुरु झाली आहे . यानिमित्त येथे अश्व बाजार भरतो . चेतक फेस्टिव्हलच्या माध्यमातून यात्रेची व्याप्ती वाढवण्यात येत आहे . त्यामुळे यात्रेत अधिकाधिक सोयी आणि नावीन्य आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे . चेतक फेस्टिव्हल पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात . त्यामुळे दरवर्षी ऐतिहासिक गड . किल्ल्याच्या प्रतिकात्मक प्रवेशद्वाराचे तटबंदीचे देखावे उभारण्यात आले आहेत .
या देखाव्याने चेतक फेस्टिव्हलचे प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे . तसेच याच मैदानावर अश्व स्पर्धा रंगणार असल्याने देशातील अनेक राज्यातून अप्रतिम सौदर्य , निपूण घोडे येथे दाखल होत आहेत . त्यांना राजेशाही थाटात सोयी करण्यात आल्या आहेत .घोड्यांची निगा राखण्यासाठी तंबू उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे .
किल्ला , गड . अश्व असे समिकरण आहे . राजा महाराजांच्या काळात घोड्यांची सवारी असायची . छत्रपती शिवाजी महाराजांनी घोडयाचा मदतीने अनेक गड . किल्ले जिंकले . त्या पार्श्वभूमीवर येथील चेतक फेस्टिव्हलतर्फ अश्व नगरीत जाण्यासाठी यंदा राजस्थानमधील जोधपूर चा उम्मेद भवन पॅलेस चा देखावा तयार केला आहे . उम्मेद पॅलेस हा देशातील सर्वात महाग व सुंदर महला पैकी आहे . महाराजा उम्मेदसिंह यांचा महल होता . या देखाव्याच्या प्रवेशद्वाराने अश्व व पर्यटकांनी जाण्यासाठी मार्ग तयार केला आहे . अश्व उभे करण्यासाठी राजेशाही पध्दतीने राहुट्या तयार केल्या आहेत .पर्यटक ,यात्रेकरू , अश्वखरेदीदार यांना राहण्यासाठी विश्रांती साठी तंबूची व्यवस्था केली आहे .
…….








