नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा गावालगत असलेल्या वरखेडी नदीच्या किनाऱ्याजवळ एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा गावालगत असलेल्या वरखेडी नदीच्या किनाऱ्याजवळ अज्ञाताने परित्याग करण्याच्या उद्देशाने एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक कचऱ्यात उघड्या जागी सोडून गेला.
याबाबत पोशि.गिरीवर रविंद्र साबळे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अंकिता बाविस्कर करीत आहेत.








