Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

team by team
December 13, 2022
in राज्य
0
स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
नंदुरबार   l
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दहावी, बारावी व त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते.
6 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्यात आला असून शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेले विद्यार्थीही या योजनेचा लाभ घेवू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांस 50 टक्के गुण असणे आवश्यक राहील. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांस 3 टक्के आरक्षण असून यासाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी नजीकच्या शासकीय मुलांचे, मुलींचे वसतीगृहात तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा.
बातमी शेअर करा
Previous Post

सशस्त्र सेना ध्वजनिधीस प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Next Post

नदीच्या किनाऱ्याजवळ एक दिवसाचे अर्भक आढळले

Next Post
दोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

नदीच्या किनाऱ्याजवळ एक दिवसाचे अर्भक आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add