नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा येथील उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालया समोर बेघर संघर्ष समिती चे अध्यक्ष दिलावरशा कादरशा, चिरागोद्दीन शेख, डॉ.रामचंद्र शिंपी यांचे नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
शहादा शहरातील गोर गरीबांना घरकुल बांधून देण्यासाठी शासनाने ११ करोड चा निधी शहादा नगरपालिकेला दिलेला असतांना नगरपालिकेने घरकुल योजना राबवली नाही. तसेच अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे बेघर संघर्ष समिती ने उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालया समोर ठिय्या आंदोलन, उपोषण करून विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सादर केले.
सदर निवेदन नायाब तहसीलदार यांनी स्विकारले, आणि निवेदनातील मुद्द्यांबाबत प्रशासनाकडून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी महिला शहर अध्यक्षा गुड्डी चव्हाण, शहर अध्यक्ष सादिक अंसारी, मंगल कुवर व पोलीस अधिकारी यांचे सह शेकडो च्या संख्येने महिला लाभार्थी उपस्थित होते.








