नंदूरबार l प्रतिनिधी
बोरद येथे निवडणुकीनंतर प्रथमच भाजपाची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर आ.राजेश पाडवी यांच्या कडून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आला आहे.
बोरद गाव म्हटलं म्हणजे तळोदा शहरानंतर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात वयस्कांसोबत तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी मोबाईल धारकांची संख्याही मोठी आहे.त्यामुळे प्रत्येकाला आपला सेल्फी काढण्याचा मोह आवरला जात नाही.ही बाब बोरद येथील भाजपाचे सरपंच, उपसरपंच त्याच बरोबर पंचायत समितीचे उपसभापती विजयसिंग राजपूत यांच्या प्रयत्नांतून आ.राजेश पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून बोरद येथे आकर्षक सेल्फी पाॅईंट मंजूर करून घेतला आहे जेणे करून सेल्फी घेतांना बोरद वासीयांना आपल्या गावाची ओळख दाखवता येणार आहे.
त्याच बरोबर प्रभाग क्र. ५ मधील काँक्रीट रस्ता ही आ.राजेश पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झाला असल्याने वरील दोन्ही कामाचा भूमीपूजनाचा कार्यक्रम आ.राजेश पाडवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती लताबाई वळवी,तळोद्याचे नगराध्यक्ष.अजयभैया परदेशी,प्रदेश सदस्य डाॅ.शशिकांत वाणी, जि.प.सदस्या सुनिता पवार,प.स.सदस्य चंदन पवार,शहादा विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण ठाकरे,आदिवासी आघाडी प्रमुख दारासिंग वसावे,आदिवासी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दरबारसिंग पाडवी,माजी.जि.प.सदस्य जितेंद्र पाडवी ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नितीन वसावे,गोपी पावरा तसेच परिसरातील सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे उपस्थित होते.
यावेळी बोरद गावाचे भिलाव,मनोहर भिलाव,ग्रा.स. संतोष ढोडरे,ज्योतिबाई साळवे,निलूबाई ठाकरे,लताबाई पवार,अजय मगरे, शांतीलाल पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मंगेश पाटील यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी मानले. कार्यक्रम व्यवस्थित होणे कामी बोरद दुरक्षेत्राचे गौतम बोराडे सह सर्व कर्मचारी हजर होते.








