नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा येथे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या कित्येक दिवसापासून नवीन इमारतीत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बंधूंचे हाल अपेष्टा होत होते सदर बाब आमच्या निदर्शनास आली, नवीन इमारतीत दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसंदर्भात कोणताही विचार करण्यात आलेला नव्हता.जेष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांग बांधवांना प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी तिसऱ्या मजल्यापर्यंत जाने म्हणजे भगीरथ प्रयत्न करण्यासारखे होते.
या ठिकाणी तरी या ठिकाणीदिव्यांग बांधवांसाठी काही उपाय योजना करण्याची मागणीचे निवेदन नायब तहसीलदार देण्यात आले.याबाबत त्वरित कार्यवाही करून जेष्ठ नागरिक व दिव्यांग बंधूंना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.यावेळी संतोष बाबा वानखेडे, शिवदास बाबा साठे, जगदीश वानखेडे,गणेश शिवदे, जतीन साठे,गिरीष वानखेडे,सचिन भोई आदी उपस्थित होते.