म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या वतीने एस.ए.मिशन स्कुल जिमखाना येथे नंदुरबार जिल्हा ज्युदो खेळाडू मुला मुलींचा संघ निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले होते.
तसेच कोल्हापूर जिल्हा ज्युदो असोसिएशन व महाराष्ट्र राज्य ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ते 11 डिसेंबर रोजी दीक्षांत सभागृह शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे होणाऱ्या 49 वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर्स ज्युदो स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे अजोजन करण्यात आले आहे.
सदर राज्य ज्युदो स्पर्धेसाठी मिशन हायस्कूल च्या तीन खेळाडूंची निवड 48 ते 52 किलो वजन गटात धनश्री राजपूत 55 ते 60 शाहदाब जिब्रहील शेख, – 66 किलो मध्ये नरेंद्र सुभाष बिराडे यांची निवड झाल्याबद्दल एस.मिशन ट्रस्ट चे चेअरमन रेव्ह जे. एच पठारे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी मुख्याध्यापिका नूतन वर्षा वळवी यांनी विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या सोबत डॉ.सुनिता अहिरे, ट्रस्टी डॉ. राजेश वसावे, मार्था सुतार, सब स्टिन जयकर सुषमा कालू फ्रँकलिन चर्च चे धर्मगुरू रेव्ह.अनुप वळवी, संदेश यंगड नंदुरबार जिल्हा ज्युदो संघटनेचे सचिव संतोष मराठे अध्यक्ष गणेश मराठे आदी उपस्थित.