नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील जामीया शैक्षणिक संकुलात आठवीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा चाकुणे भोकसुन हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. मोबाईल चोरीवरुन दोन विद्यार्थ्यांचा वाद होवुन एकाने दुसऱ्याची हत्या करत जुन्या इग्लीश मिडीयम स्कुलच्या वसतीगृहाच्या स्नानगृहात मृतदेह फेकुन दिला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणी नंतर पोलीसांनी 14 वर्षीय एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील जामीया शैक्षणिक संकुलात आठवीत शिकणाऱ्या पंधरावर्षीय विद्यार्थी फैजल उर रहेमान तकी रा.अहमदाबाद (गुजरात) यांच्या सोबत शिकणाऱ्या सहकारी अल्पवयीन मित्रानेच दोन दिवसांपुर्वी मोबाईल चोरीच्या संशयातुन चाकुने भोकसुन खून केला.त्यानंतर हत्या करत जुन्या इग्लीश मिडीयम स्कुलच्या वसतीगृहाच्या स्नानगृहात मृतदेह फेकुन दिला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणी नंतर पोलीसांनी 14 वर्षीय एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.