नंदूरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज तहसिल कार्यालयात झालेल्या अर्ज छाननीत सरपंच पदासाठीचा एक तर सदस्यपदाचे ९ अर्ज अवैध ठरल्याने आता सरपंच पदासाठी 93 तर सदस्य पदासाठी 466 अर्ज दाखल वैध ठरले. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर असुन त्याच दिवशी चित्र स्पस्ट होणार आहे.
ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणार्या नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे, रनाळे, तलवाडे बुद्रूक, रजाळे, आसाणे, घोटाणे, ओसर्ली, सातुर्खे, कानळदे, खैराळे, कोठडे, धानोरा, करणखेडा, तिसी, अमळथे, चौपाळे, राकसवाडे, घुली १८ या ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकुन 94 तर सदस्य पदासाठी 475 अर्ज दाखल करण्यात आले होते.आज तहसिल कार्यालयात झालेल्या अर्ज छाननीत सरपंच पदासाठीचा 1 तर सदस्यपदाचे ९ अर्ज अवैध ठरल्याने आता सरपंच पदासाठी 93 तर सदस्य पदासाठी 466 अर्ज वैध ठरले.
आज झालेल्या अर्ज छाननीत सरपंचासदासाठी तलवाडे बु.येथील निर्मला आनंदा पाटील यांचा अर्ज जात वैधतेमुळे अवैध ठरवण्यात आला.तर सदस्यपदासाठी तिसी येथील मिराबाई भिल वैधता प्रमाणपत्र नाही, धानोरा आरती वसावे शैक्षणीक पात्रता,अजिंक्य वसावे वय कमी, ओसर्ली येथील सुनिल भिल, आक्का गावीत यांचे दोन अर्ज, कोकीळाबाई कोळी यांचे अर्ज जात वैधतेमुळे अवैध ठरवण्यात आला.तर सवाबाई भिल जात वैधता प्रमाणपत्र, रजाळे येथील विद्याबाई पानपाटील जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने नामांकन अवैध ठरवण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २० डिसेंबर रोजी होईल.नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर असुन त्याच दिवशी निवडणुकीचे चित्र स्पस्ट होणार आहे.