नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय किसान सेनेमार्फत निवेदन सादर करीतो की , महाराष्ट्रातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांना शेतमजुर पुरविण्याचे नियोजन करुन शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा कमी होवुन शेतकऱ्यांना किमान मजुरांवरील मजुरीचा पैसा वाचल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी जे आत्महत्या करीत आहेत . त्यास थोड्याफार प्रमाणात अटकाव होईल . जेणेकरुन ग्रामपंचायतीमध्ये शेतमजुरांची मागणीचा अर्ज ग्रामपंचायतीत दाखल करुन शेतकरी व शेतमजुरांना दोघांना समान न्याय मिळेल , मजुरांना रोजगाराचा प्रश्न मिटेल . तसेच शेतकऱ्यांना मजुरीचा पैसा वाचवुन दोन पैसा त्याच्या खिश्यातही राहील , म्हणून भविष्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी मुख्यमंत्री यांनी हा प्रश्न गंभीरपणे विचारात घेवुन शेतमजुर व शेतकरी यांचा ग्रामपंचायतीमार्फत समन्वय साधुन महाराष्ट्रातील शेतमजुर व शेतकरी या दोघांना आपल्यामार्फत वाचविण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे कराल अशी आम्ही आशा बाळगतो . हा प्रश्न आपण गांभिर्याने व तत्परतेने यावर विचार विनिमय करुन योग्य तो निर्णय आपण घ्याल याची आम्हाला खात्री आहे . जर या प्रश्नावर येत्या महिन्याभराच्या आत योग्य तो निर्णय झाला नाही तर भारतीय किसान सेना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शेतकरी व शेतमजुरांचे मोठे आंदोलन उभारुन मंत्रालयावर धडक देवू व होणाऱ्या विपरीत परिणामास सर्वस्वी शासन , प्रशासन जबाबदार राहील , असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनावर किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडीत तडवी, प्रदेश संघटक सुरेश जगदेव, प्रदेश प्रवक्ता सुभाष नेरकर, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब नगराळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गौतम चौधरी, उत्तर महाराष्ट्र ओबीसी सेल अध्यक्ष छत्रपालसिंग मोरे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष अंकलेश वळवी, जिल्हा महासचिव आधार ठाकरे, नंदुरबार भटके विमुक्त सेल अध्यक्ष कांतिलाल जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष संजय पिंपळे, धुळे जिल्हा युवा अध्यक्ष विजय पाटील, धुळे जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष गनी शेख रहेमान, धुळे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद पाटील, नंदुरबार तालुकाध्यक्ष बिंदास गावीत, नंदुरबार तालुका उपाध्यक्ष रिवदास वळवी, तळोदा तालुकाध्यक्ष हिरालाल पाडवी, शहादा तालुकाध्यक्ष किशोर पाटील, धडगांव तालुकाध्यक्ष सिंगा पाडवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष केशव तड़वी, नवापूर तालुकाध्यक्ष गौतम गावीत, तुलसीदास गावीत, सुधाकर वसावे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.