Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिलाडी शिवारातील युवतीच्या खुन प्रकरणी स्था.गु,अन्वेषण शाखेने २१ स्थानकांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत खुनाचा केला पर्दाफाश

team by team
September 6, 2021
in क्राईम
0
बिलाडी शिवारातील युवतीच्या खुन प्रकरणी स्था.गु,अन्वेषण शाखेने २१ स्थानकांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत खुनाचा केला पर्दाफाश

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार परिसरातील  बिलाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ युवतीचा निर्घृण खून करणार्‍या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २१ स्थानकांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत गुजरात राज्यातुन अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२६ ऑगस्ट रोजी  बिलाडी ता.नंदुरबार शिवारातील गट  क्र. ४९८ च्या शेताच्या बांधाजवळील रेल्वे ट्रॅकजवळ झाडाझुडपात एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळुन आल्याने स्थानिक नागरीकांनी तात्काळ पोलीसांना याबाबत कळविल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन पडलेल्या मृतदेहाची पाहणी केली असता लाल कुर्ता व पांढरी पँट घातलेली एक अनोळखी महिला रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमीनीवर पडलेली होती. तसेच मृत महिलेचा एक हात धडापासुन वेगळा पडलेला होता व एका हातावर तिक्ष्ण हत्याराने झालेल्या जखमेच्या खूणा दिसत होत्या. सदर बाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक गणेश बापु सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
घटनास्थळावर मयताची ओळख पट शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे. मोबाईल, सी.सी.टी.व्ही. फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तु मिळुन आलेली नव्हती. तसेच सदरचा गुन्हा हा कधी घडला याबाबत कोणतीही माहिती नसल्यामळे गन्हा उघडकीस आणण्याचे व मयताची ओळख पटविण्याचे तसेच जिवेठार मारण्याचा उद्देश काय? याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते.
दि.२९ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना एका गुप्त बातमीदाराने बातमी कळविली की, पाचोराबारी येथील रेल्वे फाटकाजवळ राहणारे कल्पेशभाई पटेल यांचे घरी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आहेत, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी एका पथकास लागलीच पाचारोबारी येथे पाठवुन सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करण्यास सांगितल्याने दि. २४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.३० वा. सुमारास एक तरुण व एक तरुणी नंदुरबारच्या दिशेने जातांना दिसुन आले व जात असलेली तरुणीच्या अंगावर असलेले कपडे हे मयताच्या अंगावर मिळुन आलेल्या कपड्याच्या वर्णनाची मिळते जुळते होते. मिळालेले सी.सी.टी.व्ही. फुटेज हे रात्रीच्या अंधारात असल्यामुळे अतिशय अस्पष्ट होते.
तसेच ढेकवद येथील रेल्वे ट्रॅकमनने दि. २४ ऑगस्ट रोजी सुरत ते भुसावळ पॅसेंजरमधुन एक तरुण व एक तरुणी ढेकवद स्टेशनला उतल्याचे पाहिले अशी माहिती दिल्याने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पाचोराबारी ते सुरत दरम्यान असलेल्या सर्व २१ स्थानकांचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यासाठी एक पथक गुजरात राज्यात रवाना केले. दि. ३१ऑगस्ट रोजी सुरत रेल्वे स्टेशन व स्टेशनच्या बाहेर असलेले सर्व सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करीत असतांना सुरतच्या रेल्वे प्लॅट फॉर्मवर संशयीत आरोपी व मयत तरुणीच्या अंगावर असलेल्या कपड्यांच्या वर्णनाप्रमाणे कपडे घातलेली तरुणी दिसुन आले. आणखी इतर सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यांची पाहणी केली असता एका रिक्षातुन तेच संशयीत तरुण व मयत तरुणी उतरतांना दिसले, म्हणून रिक्षा चालकाच्या मदतीने संशयीत इसम व मयत महिला यांचा मार्गक्रमन निश्चित केला. त्यांनी एका ठिकाणी रिक्षा बदललेली दिसली. त्या रिक्षा चालकाच्या मदतीने देखील पुन्हा मार्गक्रमण निश्चित केला. संशयीत तरुण व मयत तरुणी हे कापुदरा चौक, केंब्रिज ब्रीज येथे रिक्षात बसतांना दिसुन आले म्हणून परिसरातील सर्व रिक्षा चालकांकडुन माहिती घेण्यात आली. परंतु उपयुक्त अशी कोणतीही माहिती पथकाला मिळत नव्हती.
दि. ४ सप्टेंबर रोजी नवागांम सुरत येथील अल्ट्रा लाईफ स्टाईल या कपड्याच्या दुकानाचे सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करीत असतांना तेथे देखील संशयीत तरुण व मयत तरुणी हे दिसुन आले दुकान मालकाकडुन त्याची माहिती घेवुन त्या माहितीच्या आधारे संशयित इसमास ताब्यात घेतले.
दि. ५ सप्टेंबर रोजी संशयीत इसम विनयकमार रामजनम राय (वय ३८) रा खमहौरी पो राजापर ता. राजगंज जि. सिवन, बिहार यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबार येथे आणुन विचारपूस केली असता संशयीत आरोपीताने अतिशय धक्कादायक अशी माहिती दिली. मयत तरुणीचे नाव सिताकुमारी समदकुमार भगत (वय २४) रा. चमारीया चैनपुर ता. मशरक जि. छपरा असे सांगुन मयत तरुणी देखील आरोपीच्या गावाजवळील होती व दोन्हींचे मागील दोन वर्षापासुन प्रेम संबंध होते. मयत तरुणी दि.२३ ऑगस्ट रोजी बिहार येथुन सुरत येथे संशयीत आरोपीकडे आली तेथे आल्यानंतर मयत तरुणीने संशयीत तरुणाशी विवाहासाठी तगादा लावला त्यावेळेस संशयीत तरुणाने विवाहीत असल्याचे मयत तरुणीला सांगित त्याने त्यांचा वाद झाला म्हणून संशयीत तरुणाने मयतास पुन्हा बिहार येथे तिच्या मुळ गावी सोडण्यासाठी सुरत येथुन दि.२ ऑगस्ट रोजी सुरत भुसावळ पॅसेंजरने रवाना झाले, परंतु रेल्वेमध्ये देखील मयत तरुणी संशयीत आरोपीशी वाद करत असल्याने संशयीत आरोपी ढेकवद रेल्वे स्थानकावर उतरुन गेला तसेच मयत तरुणी देखील त्याच्या मागे ढेकवद रेल्वे स्थानकावर उतरली. दोन्ही काही वेळ पायी चालत गेल्यानंतर संशयीत आरोपीताने रात्रीच्या अंधाराचा व एकांताचा फायदा घेत बिलाडी नंदुरबार शिवारात रेल्वे ट्रॅकजवळ एका शेतातील बांधाच्या बाजुला काटेरी झुडपात नेवुन सदर तरुणीस ब्लेडने गळा चिरुन जिवे ठार मारल्याचे कबुल केले.
कुठल्याही प्रकारचा पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावा, नसतांना अतिशय क्लिष्ट व आव्हानात्मक गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीतास गुन्ह्याच्या पुढील कारवाईकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे, पोलीस नाईक सुनिल पाडवी, बापु बागुल, मनोज नाईक पोलीस अमंलदार किरण मोरे, यशोदिप ओगले, चालक पोलीस शिपाई सतिष घुले यांच्या पकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तायक्वांदो परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप

Next Post

जनतेचे आरोग्य महत्वाचे गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

Next Post
ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जनतेचे आरोग्य महत्वाचे गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावगुंडांचा आका कोण,मुख्य सुत्रधारालाही अटक करा, माजी आ.शिरीष चौधरी यांची मागणी

गावगुंडांचा आका कोण,मुख्य सुत्रधारालाही अटक करा, माजी आ.शिरीष चौधरी यांची मागणी

January 14, 2026
सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंना अभिवादन

सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊंना अभिवादन

January 14, 2026
नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन रेझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन रेझिंग डे निमित्त विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

January 11, 2026
शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश चौधरी उपनगरध्यक्षपदी विजयी

शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश चौधरी उपनगरध्यक्षपदी विजयी

January 11, 2026
ॲड.राम रघुवंशी मित्र मंडळातर्फे तालुक्यातील पूर्व भागातील 500 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

ॲड.राम रघुवंशी मित्र मंडळातर्फे तालुक्यातील पूर्व भागातील 500 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

January 11, 2026
काळटोळमी येथे कृषी महाविद्यालयाच्या ‘रासेयो’ शिबिराची सांगता

काळटोळमी येथे कृषी महाविद्यालयाच्या ‘रासेयो’ शिबिराची सांगता

January 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add