Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mahesh Patil by Mahesh Patil
December 2, 2022
in राजकीय
0
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई  l

 

प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव श्री. व्ही. श्रीनिवास यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी श्री. श्रीनिवास यांचे स्वागत करुन प्रशासकीय सुधारणांच्या क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. राज्यात सुप्रशासन विषयक मार्गदर्शिका (गुड गव्हर्नन्स मॅन्युअल) तयार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना देतानाच देशात सुप्रशासन निर्देशांकात द्वितीय क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल, शिवाय कामकाज संपूर्णपणे कागदविरहीत (पेपरलेस) होणार असल्याने अधिक सुलभता येणार आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून राज्याच्या सर्व कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सर्व कार्यालये ‘ई-ऑफिस’ वापरू लागले की मोबाईलवर देखील कामकाजाच्या फाईल्स, कागदपत्रे पाहता येतील, त्याला मान्यता देता येणार आहे.

 फाईल्सचा प्रवास होणार कमी

सध्या मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी येणारी फाईल ८ विविध स्तरांमधून येते, या अधिकच्या स्तरांमुळे संबंधित विषयांच्या फाईल्सवर निर्णय होण्यास विलंब लागतो, म्हणून गतिमान कारभारासाठी फाईल्स सादर करण्याचे स्तर कमी करण्याच्या सूचना देतानाच फक्त चार स्तरांवरुनच फाईल मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

ऑनलाईन सेवांची संख्या वाढणार

ई-सेवा निर्देशांकात देखील महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आणण्यासाठी जास्तीत-जास्त सेवांची संख्या वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. सध्या राज्यातील ४५० सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत.

 सार्वजनिक तक्रारींवरील कार्यवाहीचा मुख्यमंत्री स्वतः घेणार आढावा

हे जनतेचे सरकार असून सर्वसामान्यांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षापूर्तीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या सार्वजनिक तक्रारींच्या निवारणासाठी ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. या तक्रारींचे डिजिटल ट्रॅकिंग करण्यात येईल, तक्रारींवर विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी एक स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करण्यात येणार आहे. या सार्वजनिक तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीचा स्वतः आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

आता प्रत्येक विभागांची आणि जिल्ह्यांची होणार ‘गुड गव्हर्नन्स रॅंकिंग’

सध्या महाराष्ट्रात फक्त राज्यस्तरावर सुशासन पद्धतीचे पर्यवेक्षण होते, आता शासनाच्या प्रत्येक विभागांची आणि जिल्ह्यांची गुड गव्हर्नन्स रॅंकिंग केली जाणार आहे. शासकीय विभाग आणि जिल्ह्यांच्या प्रशासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवांची, सुशासनाची क्रमवारी निश्चित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या सुशासनाच्या क्रमवारीमुळे विभागांमध्ये आणि जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईलच, शिवाय जनतेला मिळणाऱ्या सेवांचा दर्जा वाढेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

 अभिनव, नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या यशोगाथांचे संकलन

राज्याच्या प्रशासनात सुरू असलेल्या अभिनव, नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या यशोगाथांचे संकलन केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील विशेष कार्य केलेल्या ५० प्रयोगांची निवड केली जाणार असल्याचे सचिव श्री. श्रीनिवास यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी विजय चौधरी यांची निवड, जिल्हाभरातील कार्यकत्यांकडून जल्लोष

Next Post

मंजुर अल्पसंख्यांक महिला वसतीगृहाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अल्पसंख्यांक विकास व हक्क फाऊंडेशनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

Next Post
मंजुर अल्पसंख्यांक महिला वसतीगृहाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अल्पसंख्यांक विकास व हक्क फाऊंडेशनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

मंजुर अल्पसंख्यांक महिला वसतीगृहाचा प्रश्‍न मार्गी लावावा, अल्पसंख्यांक विकास व हक्क फाऊंडेशनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

January 28, 2023
भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

January 28, 2023
भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

January 28, 2023
नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

January 28, 2023
व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची  घोषणा

व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची घोषणा

January 28, 2023
मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

मद्यवाहतूक करणाऱ्या कंटेनरसह सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलीसांनी केला जप्त, चालक झाला फरार

January 28, 2023

एकूण वाचक

  • 2,686,621 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group