नंदूरबार l प्रतिनिधी
साखर कारखानदार व गूळ उद्योजक मालकांच्या विरोधात विविध मागण्यासाठी शेतकरी व एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने नळगव्हाण फाटा ता.तळोदा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गुऱ्हाळ मालक व साखर कारखानदार, श्रीकृष्ण खांडसरी तळोदा, दसवड खांडसरी, समशेरपुर खांडसरी, कुकरमुंडा खांडसरी, चिखली खांडसरी विरोधात उचल रक्कम व अंतिम बिल रक्कम जाहीर बाबत प्रशासनास निवेदन देण्यात आले होते. मात्र उपरोक्त प्रमाणे दाखल न घेतल्याने एकलव्य आदिवासी युवा संघटना व शेतकर्यांच्यातर्फे साखर कारखानदार व गूळ उद्योजक मालकांच्या विरोधात विविध मागण्यासाठी शेतकरी व एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने नळगव्हाण फाटा ता.तळोदा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी साखर कारखान्यांनी उसाच्या प्रति टन भाव 2700 ते 3000 दरम्यान देणे, गुऱ्हाळ मालकांनी उसाचा प्रति टन भाव 2300 ते 2400 दरम्यान आदी मागण्या करण्यात आल्या.तळोदा तहसीलदार यांनी मध्यस्थी करून आश्वासन दिल्याने रस्ता रोको आंदोलनास तूर्तास स्थगिती देण्यात आली.
प्रशासनाने तोडगा न काढल्यास येत्या काही दिवसात कारखानदार,गुऱ्हाळ उद्योजक व शेतकरी यांच्यात महत्वाचा दुवा बनलेल्या प्रशासना विरोधात अंदोलन अधिक तीव्र केले जाईल. त्यावेळेस काही अनुचित प्रकार व घटना घडल्यास त्या घटनेस सर्वस्वी जबाबदार प्रशासनास धरले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ॲड. गणपत देविसिंग पाडवी,नंदुरबार जिल्हाध्यक्ष रवि सोनवणे, तळोदा शहराध्यक्ष विनोद पाडवी, तळोदा शहर अध्यक्ष दिनेश पाडवी, उपाध्यक्ष उमेश वसावे,तळोदा युवा अध्यक्ष विकास ठाकरे, विशाल समुद्रे, सुनील वळवी. सिगा नाईक, गोविंद नाईक, रवींद्र वसावे, जयदीप वसावे, जयवंत तडवी, रेमा नाईक, पुजऱ्या पाडवी,अजना पाडवी,तापसिगं पाडवी,सुभाष पाडवी,मानसिह पाडवी,उदयसिंग वळवी,लखन वळवी,यशवंत पाडवी,कुशा दादा,हानचा पाडवी,रतिलाल पाडवी,दारासिह वळवी,सुभाष पाडवी, विलास पाडवी, आंनद पाडवी, किरन नाईक, मंदिप नाईक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.