नंदुरबार l
कृषि विभागामार्फत सन 2022-2023 साठी कृषि कल्याण अभियान-3 मोहिमेंतर्गत आकांक्षित जिल्ह्याकरीता कृषि यांत्रिकीकरण उपअभियानामधील घटक क्रमांक सहा नुसार कृषि औजारे बँक स्थांपन करण्यासाठी शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट, नोंदणीकृत बचत गट, विविध कार्यकारी संस्था यांनी 9 डिसेंबर, 2022 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.
कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी 10 लाख खर्चाची मर्यादा असून त्याकरिता 80 टक्के किंवा अनुदानाची उच्चत्तम मर्यादा 8 लाख यापैकी जी कमी असेल त्या मर्यादेपर्यंत अनुदान लाभार्थ्यांस डीबीटी प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येईल. योजनेची अधिक माहिती व मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या http://krishi.